Soybean Market Price : संपूर्ण भारत वर्षात सोयाबीन (Soybean Crop) या नगदी पिकाची (Cash Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) करतात.
खरं पाहता सोयाबीन खरीप हंगामात (Kharif Season) उत्पादीत केले जाणारे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचा बाजार भावात (Soybean Rate) सातत्याने घसरण होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आता बाजारात नवीन सोयाबीन देखील दाखल झाला आहे.

ज्या शेतकरी बांधवांनी आगात सोयाबीनची पेरणी केली आहे अशा शेतकरी बांधवांचा नवीन सोयाबीन आता बाजारात आला आहे. मात्र सोयाबीनच्या दरात होत असलेली घसरण शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढवत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला होता. मात्र आता सोयाबीनच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा पाहायला मिळत आहे.
मित्रांनो रविवार असल्याने राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. मात्र, शेवगाव एपीएमसीमध्ये आज सोयाबीनचा लिलाव झाला आहे. आज झालेल्या लिलावात सोयाबीनच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा झाली असून 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला बाजार भाव मिळाला आहे. सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा झाली असली तरी देखील सोयाबीन अजूनही सहा हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा तेराशे रुपये कमी दरात विक्री होत आहे.
त्यामुळे सोयाबीनला सध्या मिळत असलेल्या दरात सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल होत असल्याचे सांगितले जात आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, बाजारात अजूनही नवीन सोयाबीनची अपेक्षित अशी आवक बघायला मिळत नाही. तरीदेखील सोयाबीनच्या दरात अजूनही वाढ होत नाही.
या परिस्थितीत आगामी काळात जवा नवीन सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होईल तेव्हा बाजार भाव अजून खाली जाईल की काय अशी शंका आता शेतकरी उपस्थित करत आहेत. यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला नेमकी कुणाची नजर लागली असा मोठा प्रश्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळतं आहे.
मित्रांनो आज शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची सात क्विंटल आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनचा 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव देखील 4700 रुपये प्रति क्विंटल एवढाच राहिला. सर्वसाधारण बाजार भाव देखील आज या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4700 रुपये प्रति क्विंटल एवढाचं सर्वसाधारण बाजारभाव नमूद करण्यात आला आहे.