नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणूक निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा आपकडे एकहाती सत्ता सोपवली आहे. त्यामुळे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून लवकरच शपथ घेतील.
केजरीवाल यांचं व्हॅलेंटाईन डे कनेक्शन समोर येत आहे. त्यामुळे ते 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेतील असा अंदाज आहे.
पहिल्यांदा अरविंद केजरीवाल यांनी 28 डिसेंबर 2013 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली . यानंतर केवळ 49 दिवसांनंतर दिवसानंतर राजीनामा दिला. तो दिवस होता 14 फेब्रुवारी 2014.
2015मध्ये मध्ये पुन्हा निवडणूक झाली आणि आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले. हे निकाल 10 फेब्रवारीला लागले. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी 14 फेब्रवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला.
आपने या निवडणुकीत पूर्ण ताकद लावून 70 पैकी 67 जागांवर ऐतिहासिक विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपला केवळ 3 जागांवर विजय मिळत आला. यानंतर अरविंद केजरीवाल यांचं 14 फेब्रवारीशी काही वेगळंच नातं तयार झालं.
मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 14 फेब्रवारी 2016 रोजी त्यांनी व्हॅलेंटाईनचा उल्लेख करत ट्विट केलं. यात केजरीवाल म्हणाले, ‘मागील वर्षी याच दिवशी दिल्लीला ‘आप’सोबत प्रेम झालं होतं.
हे नातं खूप खोल आणि कधीही न संपणारं आहे.’ 2018 मध्ये केजरीवाल सरकारने 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 14 फेब्रवारीलाच एक कार्यक्रमाचं आयोजन केलं. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा देखील मुख्यमंत्रिपदाची शपथ व्हॅलेंटाईन डेलाच शपथ घेऊन आपलं खास कनेक्शन दाखवणार का हे पाहावे लागणार आहे.