संगमनेर :- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत असल्या,
तरी राज्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते वेगळे वागतील असे मला वाटत नाही, अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी व्यक्त केली.

थोरात म्हणाले, विखे भाजपत जाणार असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांत सुरू आहे. तथापि, राज्यातील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते वेगळं वागतील असं मला वाटत नाही.
सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये असलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांत मतभेद आणि मतमतांतरे असतात. मात्र, यावेळची निवडणूक विचारधारेची असल्याने आपसांतील मतभेद विसरले पाहिजेत.
भाजप सरकार घालवण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्षातील सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे थोरात म्हणाले.
- GST On Gold: 1 लाखाचे सोने खरेदी कराल तर किती द्यावा लागणार जीएसटी? बघा फायद्याची माहिती
- Onion Rate: आता सरकारच्या माध्यमातून ग्राहकांना मिळेल 5 ते 10 रुपयांनी स्वस्त कांदा! कसे ते वाचा?
- Cotton News: तुम्हालाही तुमच्या कापसाला मिळवायचा 8110 रुपयाचा हमीभाव? तर ‘हे’ काम करा…
- Investment Scheme: 5 लाखाची गुंतवणूक मिळवून देईल तुम्हाला 15 लाख! वाचा संपूर्ण माहिती
- NSC Scheme: कसे मिळेल 5 वर्षात 5 लाख रुपये व्याज? समजून घ्या संपूर्ण गणित