अपघातातील मृत व्यक्तीवरच गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

शेवगाव | अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीवरच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची वेळ शेवगाव पोलिसांवर आली.

मुळचे एरंडगाव येथे राहणाऱ्या मनोज विष्णू नजन (सध्या श्रीकृष्णनगर शेवगाव, वय ३१) याचा

२ रोजी रात्री शहरातील साई आनंद एजन्सीसमोर बुलेट या वाहनावरून पडून अपघाती मृत्यू झाला.

पोलिस त्या ठिकाणी गेले. त्यांनी मनोज यास ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला .

रम्यान, मनोजचा अपघाती पंचनामा करताना त्याच्याजवळ एक गावठी कट्टा व एक चाकू आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी मृत मनोजविरुद्ध गुन्हा दाखल केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment