अकोले :- तालुक्यातील खेतवाडी गावात ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी दरवाजा वाजवून घरात घुसून २४ वर्षीय महिलेवर अत्याचार करून एक लाख ४० हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याप्रकरणी शंकर किसन गभाले याच्याविरुद्ध अकोले पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत महिलेने फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, खेतेवाडी गावात दुकान असलेल्या या आदिवासी महिलेचा पती शेतमजुरी कामासाठी जुन्नर येथे जातात. ३१ जानेवारी रोजी फिर्यादीचे पती घरी नसताना आरोपी शंकर किसान गभाले याने रात्री नऊच्या सुमारास फिर्यादीच्या घराचा दरवाजा वाजवला.
फिर्यादीने दरवाजा उघडताच आरोपीने घरात येऊन अत्याचार केला. पुन्हा १ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता आरोपीने या फिर्यादीच्या घराचा बंद दरवाजा लाथ मारून उघडला. फिर्यादीस दमदाटी करून पैसे घरात कोठे ठेवले आहे? आणून दे म्हणून मारहाण केली,
तेव्हा पीडितेने १ लाख ४० हजार रुपये काढून दिले. यावेळी आरोपीने पुन्हा महिलेवर अत्याचार केला. तसेच फिर्यादीचे पतीस धमकी दिली. आरोपीचा भाऊ नारायण किसन गभाले यांनी पाठीवर व डोक्यात दगड मारून दुखापत केली.