Panjabrao Dakh : पंजाबराव म्हणताय…! विदर्भासह ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस, वाचा सविस्तर

Ajay Patil
Published:
panjabrao dakh

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मोसमी पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाची (Monsoon) हजेरी बघायला मिळत आहे. राज्यात काही भागात मुसळधार पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले.

राजधानी मुंबई तसेच ठाणे परिसरात अति मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) बघायला मिळाला. राज्यातील पश्चिम भागात विशेषता पुणे, अहमदनगर कोल्हापूर सोलापूर तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी, खानदेशातील नंदूरबार आणि विदर्भातील वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

सध्या राज्यात कोसळत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला असल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे राज्यातील काही भागात शेतकरी समाधानी असल्याचे चित्र आहे तर काही भागात शेतकरी बांधवांना यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाचा नवीन अंदाज देखील समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या नवीन अंदाजानुसार, आज कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी या दक्षिण कोकणातील जिल्ह्यांना आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता असून या अनुषंगाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी देखील आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार पुढील तीन-चार दिवस राज्यात पावसाची हजेरी राहणार आहे. त्या पुढील काही काळ देखील राज्यात मान्सून सक्रिय राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या पंजाबराव यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार 18 सप्टेंबरपर्यंत राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस कोसळणार आहे.

या दरम्यान राजधानी मुंबईमध्ये अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे. पंजाबराव यांच्या मते विदर्भातील अकरा जिल्ह्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, धाराशिव, छत्रपती संभाजी महाराज नगर, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर या जिल्ह्यात देखील आगामी काही दिवस पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त कोकण मध्ये देखील पावसाची शक्यता आहे. एवढेच नाही तर 20, 21 आणि 22 सप्टेंबर रोजी देखील राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe