Maharashtra News :राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा राजेंद्र गुंड यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांना दिलेले राजीनामा पत्र सोशल मीडियातुन प्रसिद्धीस दिले आहे.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी आपल्या कडील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
माजी उपसभापती राजेंद्र गुंड यांच्या त्या पत्नी आहेत, गेली काही दिवसांपासून राजेंद्र गुंड हे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत होत्या याच बरोबर आगामी जिल्हा परिषदेच्या दृष्टीने गुंड हे भाजपात प्रवेश करतील अशा वावड्या उठत होत्या,
आज अचानक मंजुषा गुंड यांनी आपल्या महिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आल्यानंतर तालुक्यात व जिल्हयात खळबळ माजली आहे.
दरम्यान मंजुश्री गुंड यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या पाठीमागे एका घरात दोन पद नको अशी त्यांची भूमिका असून ,
त्यांच्या मुलाला विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष पद दिले आहे. अतिशय चांगली भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या राजीनामाचा माध्यमांनी वेगळा अर्थ काढू नये अशी माहिती अहमदनगर जिल्हा पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी दिली आहे.