Patanjali Group : बाबा रामदेव (Baba Ramdev) यांचा पतंजली ग्रुप ( Patanjali Group), जो स्वदेशी उत्पादने बनवतो आणि विकतो, त्यांच्या चार कंपन्यांचा IPO (Initial Public Offering) आणण्याच्या तयारीत आहे. बाबा रामदेव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
या चार कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत
पतंजली ग्रुप आपल्या पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली लाइफस्टाइल आणि पतंजली वेलनेस या चार कंपन्यांचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे.
येत्या पाच वर्षांत या चार कंपन्यांचे आयपीओ सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. पतंजली ग्रुपची कंपनी रुची सोया या नावाने ओळखली जाणारी पतंजली फूड्स याआधीच शेअर बाजारात लिस्ट झाली आहे.
पतंजली पाच वर्षांत लाखो लोकांना रोजगार देणार आहे
पत्रकार परिषदेत बाबा रामदेव म्हणाले की, पतंजली ग्रुपचा व्यवसाय अडीच पटीने वाढून येत्या पाच ते सात वर्षांत एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
बाबा रामदेव म्हणाले की, पतंजली ग्रुप येत्या काही वर्षांत पाच लाख लोकांना रोजगार देईल. पतंजली ग्रुपचा सध्याचा व्यवसाय सुमारे 40,000 कोटी रुपयांचा आहे.
ब्रँड माफिया पतंजलीचे नाव खराब करत आहेत
बाबा रामदेव यांनी दावा केला की ग्रुपची सर्व उत्पादने उच्च दर्जाची आहेत आणि धार्मिक, राजकीय, फार्मास्युटिकल आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ‘माफिया’ त्यांची ब्रँड प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रामदेव म्हणाले की, ग्रुपने 100 हून अधिक लोकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि एफआयआर देखील दाखल केला आहे. मात्र, त्या व्यक्तींची आणि संस्थांची नावे त्यांनी दिली नाहीत.