इंदुरीकर महाराज चुकीचे वाटत असतील तर त्यांची आधी पूर्ण पार्श्वभूमी पाहावी – खासदार सदाशिव लोखंडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- इंदुरीकर महाराज यांचा स्वभाव, राहणीमान, त्यांचे विचार-आचार चांगले आहेत. ते शाळा चालवतात. महाराजांचे जनजागृतीचे काम आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली, मुले असे सर्वच भाविक त्यांचे विचार ऐकत असून त्यांचे विचार लोकांना पसंत आहेत,’ असे मत शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केले.

इंदुरीकर यांनी मुलगा-मुलगीच्या जन्माबद्दल केलेल्या वक्तव्या बाबत लोखंडे यांना विचारले असता त्यांनी इंदुरीकर यांचे काम जनजागृतीचे असल्याचे स्पष्ट केले. लोखंडे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आले होते.

‘इंदुरीकर महाराजांचे जनजागृतीचे काम आहे. आदर्श काम आहे. महाराजांचे बोलण्यामध्ये काही चुकले असेल. परंतु, त्यांचा तसा स्वभाव नाही. ते महिलांच्या विरोधात बिलकूल नाहीत.

ते आमच्या जिल्ह्याचे सुपूत्र आहेत. काही लोकांना ते चुकीचे वाटत असतील. पण त्यांची पूर्ण पार्श्वभूमी पाहावी व नंतरच निर्णय घ्यावा,’ असेही लोखंडे यांनी स्पष्ट केले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment