अहमदनगर :- सुनेच्या भावानेच महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार दिल्लीगेटच्या मोहनबागेत घडला. रविवारी घडलेल्या या घटनेचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे.
भूतकरवाडीमधील नातेवाईक असलेल्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पिडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पिडित महिलेच्या बहिणीला त्रास का देता असे म्हणून शिवीगाळ करत थोबाडीत मारली. तसेच साडी, ब्लाऊज ओढून लज्जास्पद वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पिडित महिला ही 47 वर्षाची असून आरोपी हा त्यांच्या सुनेचा भाऊ आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस निरीक्षक मुलाणी यांनी भेट दिली. हवालदार काळे हे अधिक तपास करत आहेत.
- घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग 50 : 30 : 20 चा फॉर्म्युला वापरा, कधीच आर्थिक तंगी भासणार नाही
- खराब सिबिल स्कोरमुळे कर्ज मिळत नाहीये का ? मग ‘या’ टिप्स फॉलो करा अन Cibil Score सुधारा
- Mumbai Local Train : मुंबईत कडाक्याच्या उन्हाळ्यात अचानक एसी लोकलच्या १३ फेऱ्या रद्द, प्रवाशांची मोठी गैरसोय
- ओंकारच्या यशाने निंबळक मध्ये आनंदोत्सव…! तरुणांना प्रेरणादायी यश : मेहेत्रे
- Jeans Washing Tips : जीन्स पँट धुताना रंग फिकट होतो का ? ‘या’ टिप्स फॉलो करा आणि पैसे वाचवा…