अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होत आहे.
Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा
- शरद पवार, तुम्हाला देशात दोन पंतप्रधानांचा मुद्दा मान्य आहे? काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल? – मोदी
- जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळं करु, असे म्हणणाऱ्यांच्या बाजूने काँग्रेस-राष्ट्रवादी उभे आहेत – मोदी
- नगरकरांच्या प्रेमाला, विश्वासाला नमन मी नमन करतो – मोदी
- राष्ट्रीयता काय असते, सुरक्षा काय असते, हे दाखवून देणाऱ्या मोदींच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील – मुख्यमंत्री
- सुजय विखेंच्या माध्यमातून आम्ही सर्जिकल स्ट्राईक केली – फडणवीस.
- गांधीजी चिंता करू नका आम्ही तुमच्या पाठीशी – फडणवीस
- राष्ट्रवादीचे ओपनिंग कॅप्टन परत गेले, अशी अवस्था विरोधकांची,
- दुसरीकडे आपण सुजयच्या रुपाने युवा बॅट्समन उतरवलाय – मुख्यमंत्री
- पंतप्रधान मोदी नगर मध्ये दाखल.
- नगरमधील मोदींच्या सभेत दिलीप गांधींची नाराजी, बोलताना थांबण्यास सांगितल्याने समर्थकांची घोषणाबाजी.
- जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी मनधरणी केल्याने दिलीप गांधींचं पुन्हा भाषण सुरु.
- मोदींच्या सभेत भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधींचा व्यासपीठावर गोंधळ
- दिलीप गांधी बोलत असताना थांबण्यास सांगितल्याने नाराजी, मला बोलू देणार नाही का, बोलू देणार नाही तर मतं कशी मागणार?, दिलीप गांधींचा सवाल.
- नरेंद्र मोदी अंगार है, बाकी सब भंगार है… आता पाकव्याप्त कश्मीर हवा आहे… कलम 370 हटवायचे आहे- आठवले
- पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवादी कारखाने आहेत, आठवले यांचा आरोप
भाजपला सांगितलेला आहे माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागता कामा नये- रामदास आठवले - सुजय विखे व सदाशिव लोखंडे या दोघांनाही आपल्याला निवडून द्यायचं- रामदास आठवले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरमध्ये सभास्थळी दाखल, राम शिंदे, सुजय विखे पाटील आणि सदाशिवराव लोखंडे व्यासपीठावर उपस्थित - राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशवर याबाबत मला काही सांगता येणार नाही- सुजय विखे
- कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; मोदींच्या नावाने जयघोष
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभास्थळी दाखल.
- अहमदनगर शहरात मोठा बंदोबस्त तैनात
- खासदार दिलीप गांधी यांचे मनोगत थांबविण्याचा प्रयत्न खासदार गांधी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यावर चिडले.
- पालकमंत्री राम शिंदे, डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आ. बाळासाहेब मुरकुटे, महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, चंद्रशेखर कदम, खासदार सदाशिव लोखंडे व्यासपीठावर
- सकाळी 10 वाजून 27 मिनिटांनी शिर्डी येथील साईबाबा अंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन
- आर्मड स्कूल अॅण्ड सेंटर येथील हेलिपॅडवर उतरून ते चारचाकी वाहनातून सभेस्थळी पोहोचणार.
- ११ वाजता त्यांची सभा सुरु होणार आहे.
- सभेसाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थोड्याच वेळात सभास्थळी होणार आगमन
- कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; मोदींच्या नावाने जयघोष
- पालकमंत्री राम शिंदे, डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आ. बाळासाहेब मुरकुटे, महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, चंद्रशेखर कदम, खासदार सदाशिव लोखंडे व्यासपीठावर