बिबट्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राहाता तालुक्यातील वाकडी येथील लांडेवाडी-नांदूर रस्त्यावरील शिंदे-आहेर वस्ती परिसरात एका बिबट्यासह दोन मोठे बछडे असल्याचे आढळून आल्याने या परिसरात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. तीन दिवसांपूर्वी शिंदे वस्ती येथील एक शेतकरी पहाटे जनावरे ओरडत असल्याने घरातून बाहेर आले असता त्यांना बिबटे दिसले.

शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने वस्तीवरील सर्व जागे होऊन त्यांनी फटाके फोडले. दुसऱ्या दिवशी येथून एक किमी अंतरावरील वसंत शेळके यांच्या शेतातील मका पिकात बिबट्या शिरल्याचे काहींनी पाहिले. यावेळी वनपाल गोरख सुरासे यांनी ग्रामस्थांसमवेत दिवसभर बिबट्या जागा बदलून कुठे जातो यासाठी लक्ष ठेवले. अंधार होईपर्यंत बिबट्या मका पिकातून बाहेर पडला नाही.

त्याच रात्री पुन्हा अकराच्या सुमारास शिंदे वस्तीकडून नांदूर, खंडाळ्याकडे आपल्या कुटुंबासमवेत जाणाऱ्या जगदाळे यांना भररस्त्यावर बिबट्या आडवा झाला. लगेच शिंदे वस्तीकडे शिरकाव करताच भयभीत झालेल्या जगदाळे यांनी आपल्या चारचाकी वाहनाचा वेग वाढवत खंडाळ्याकडे धाव घेतली.

याचवेळी पहाटेच्या सुमारास जाधव, पानसरे वस्तीवरील अशोक जाधव यांची शेळी बिबट्याने फाडली. या सर्व प्रकारामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, या भागातील शेतकरी रात्री शेतात पाणी देण्यास जावू शकत नाही.

या परिसरात तीन बिबटे असण्याची शक्यता आहे. वनविभागाने योग्य दखल घेऊन बिबटे जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment