अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर : तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि. १७) सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास घडली.याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधीत महिला आपल्या कुटुंबासोबत मांडवे बुद्रुक याठिकाणी राहाते.
सोमवारी सकाळी महिला एकटी आपल्या घरात होती. त्यावेळी योगेश कारभारी खेमनर हा महिलेच्या घरात आला व म्हणाला की तु रात्री माझे विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, ती तक्रार मागे घे.
नाही तर तुझ्या पतीला, मुलाला जीवंत सोडणार नाही, असे म्हणून खेमनर याने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी योगेश खेमनर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com