अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर-पुणे रोडवरील जुन्या बसस्थानकाजवळील अंबर प्लाझा येथील एटीडीएफसी बॅंकेच्या मुख्य शाखेमध्ये एका महिलेची फसवणूक करण्यात आली. सोन्याचे नेकलेस व कानातील सोन्याचे फुले, १५ हजार रुपये रोख असा एकूण ६५ हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
या प्रकरणी पोर्णिमा विनायक साबळे (रा.पिंपळगाव माळवी) यांनी फिर्याद दिली. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली. १७ फेब्रुवारीला कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आम्ही अडाणी आहोत, आमचे २ लाख ४० हजार रुपये आमच्या खात्यात जमा करा, त्या बदलत्या तुम्हाला काही पैसे देवू, असे आरोपींनी फिर्यादीस सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. रुमालात पैसे आहेत, असे भासवून कागद देवून फिर्यादीकडील वरील वर्णनाचे व रोख रक्कम घेवून फसवणूक केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com