अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जामखेड :राज़्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करून सत्ता हस्तगत केली. मात्र, या सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम केले ज़ात असून, हे सरकार फसवे आहे.
या सरकारने दोन लाख रुपये कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असून, या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून निषेध करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
येथील शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे पाटील यांनी शिवजयंती उत्सवानिमित्त शिवशंभुराजे कुस्ती संकुलाच्या वतीने कुस्ती हगाम्याचे आयोज़न करण्यात आले होते. या वेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या शेतकरी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शेट्टी यांच्या हस्ते पार पडले, या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजीमंत्री राम शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शेट्टी पुढे म्हणाले, महाविकास आघाडीतील नेत्यांनी निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा करून सत्ता हस्तगत केली. मात्र, या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचे काम केले असून, दोन लाख रुपयांची कर्जमाफी ही फसवी घोषणा ठरली आहे.
महाविकास आघाडी सरकाराच्या विरोधात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून निषेध करण्यात येईल व जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होत नाही, तोपर्यंत आपण या सरकारला काम करून देणार नाही,असा इशारा शेट्टी यांनी या वेळी दिला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com