आई आणि मुलास मारहाण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगर तालुक्यातील साकत शिवारात आई व मुलास मारहाण झाल्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी घडली. छाया सोपान पवार यांनी या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

त्यानुसार अजिनाथ राजू पवार, राहुल राजू पवार, राजू मौला पवार (सर्व रा. साकत) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व साक्षीदार हे त्यांच्या घरासमोर उभे होते. अजिनाथ पवार याने फिर्यादीच्या मुलास तु माझ्याबरोबर गावात चल असे म्हणाला.

मुलाने नकार दिला असता त्याचा राग येवून त्याने फिर्यादी व मुलास शिवीगाळ आणि दमदाटी केली. तदनंतर इतर आरोपींनी हातातील लोखंडी पाईपने फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात मारहाण केली. साक्षीदार यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. पुढील तपास पोहेवॉ. खैरे हे करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment