Bank License Cancelled : काही दिवसांपूर्वी आरबीआयने (RBI) पुणेस्थित रुपी को-ऑपरेटिव्ह बँक (Rupee Co-operative Bank) लिमिटेडचा परवाना रद्द केला होता. त्यामुळे या बँकेच्या ग्राहकांना (Customers) मोठा फटका बसला आहे.
आरबीआयला जर एखाद्या बँकेत (Bank) अनियमितता आढळली तर त्या बँकेकडून दंड आकारण्यात येतो. याअगोदरही आरबीआयने बऱ्याच बँका, वित्तीय संस्थांचा परवाना रद्द केला आहे.
RBI (Reserve Bank of India) ने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून एक सहकारी बँक कायमची बंद करण्यात आली आहे. यापूर्वी आरबीआयने पुणेस्थित रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला होता.
यासाठी जारी केलेल्या नोटीसमध्ये आरबीआयने सांगितले होते की बँकेची आर्थिक स्थिती (Bank financial position) चांगली नाही. अशा परिस्थितीत बँकेला आजपासून बंद करावी लागणार आहे.
RBI ने परवाना रद्द केला
गेल्या काही महिन्यांत आरबीआयने अनेक सहकारी बँका आणि वित्तीय संस्थांचे परवाने रद्द केले आहेत. गेल्या महिन्यात आरबीआयने रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा (Government Bank LDT) परवाना रद्द केला. अशा स्थितीत आजपासून ग्राहक या बँकेत पैसे ठेवू किंवा काढू शकणार नाहीत!
आरबीआयने माहिती दिली
वास्तविक, रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा (सरकारी बँक) बँकिंग परवाना रद्द करण्यात आला. कारण बँकेने पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता संपवली होती. RBI ने दिलेल्या माहितीनुसार, ‘बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 सह कलम 11(1) आणि कलम 22(3)(d) च्या तरतुदींचे ते पालन करत नाही! त्याचे पालन करण्यात बँक अपयशी ठरली आहे.
ग्राहकांवर परिणाम :
आता प्रश्न आहे या बँकेच्या ग्राहकांच्या पैशाचे काय होणार? प्रत्यक्षात या बँकेच्या ग्राहकांना RBI च्या DICGC (डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) विमा योजनेद्वारे 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल.
म्हणजे एखादी बँक खराब आर्थिक स्थितीमुळे बंद करावी लागली तर त्यामुळे ग्राहकाला डीआयसीजीसी (डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) मार्फत 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाचा लाभ मिळतो. हे पैसे ग्राहकांना दिले जातात. या नियमानुसार या बँकेच्या ग्राहकांना काही फायदा होऊ शकतो.