अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- खरेदीसाठी गिऱ्हाईक नसल्याने तब्बल १ टन टोमॅटोसाठी पदरमोड करून माघारी नेण्याची दुर्दैवी वेळ सोनई येथील शेतकऱ्यांवर आली.
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मोंढ्यावर रविवारी सकाळी सोनई येथील शेतकरी वसंतराव गडाख यांनी आपल्या शेतीत दीड टन टोमॅटो विक्रीसाठी आणले होते.

गडाख यांना सोनई ते राहुरी या वाहतुकीसाठी २० किलो टोमॅटो मागे २५ रुपये खर्च करावा लागला. सकाळी मोंढ्यावर लिलाव सुरू झाल्यानंतर २० किलो टोमॅटोची ३० रुपयापर्यंत बोली लागली.
दीड रुपये किलोप्रमाणे टोमॅटोची किरकोळ व्यवसायिकानी खरेदी केली. १ टन टोमॅटोला खरेदीसाठी गिऱ्हाईकच नसल्याने भाडोत्री टेम्पो करून हा शेतमाल माघारी नेण्याची वेळ गडाख यांच्यावर आली.
गडाख यांनी अडीच एकरवर टोमॅटोचे पीक घेतले असून या पिकाला एकरी लाख रुपये खर्च झाला. जानेवारीपासून टोमॅटो बाजार समितीच्या मोंढ्यावर विक्रीसाठी दाखल होत आहेत.
मात्र लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर मातीमोल बाजारभाव मिळाल्याने शेतकरी गडाख निराश झाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com