विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने नगरसेवकाचा राजीनामा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पारनेर :- दरोडा व विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने आपण व्यथित झाल्याचे सांगत पारनेर नगरपंचायतीच्या प्रभाग १५ चे नगरसेवक डॉ. मुदस्सिर सय्यद यांनी सोमवारी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा नगपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द केला.

आपल्या राजिनाम्यामध्ये डॉ. सय्यद म्हणतात, २१ रोजी आपण आपल्या घरी असताना फोन करून आपणास आंनद हॉस्पिटलसमोर बोलावण्यात आले. तेथे आपणावर व आपल्या भावावन जामावने कुऱ्हाड व चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यातून बचाव करून आम्ही पोलिस ठाण्यात गेलो. तेथून रूग्णालयात दाखल झालेलो असतानाही आपणासह आपला भाऊ व आई यांच्याविरोधात दरोडा तसेच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आमच्या कुटूंबाची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असून त्यामुळे आपण व आपला परिवार व्यथीत झाला आहे. वडील डॉ. रफीक सय्यद हे संपूर्ण महाराष्ट्रात संंत साहित्याचा प्रचार व प्रसार करीत असून हिंदू मुस्लिम एक्याचा प्रसार करणारे समाजसेवक म्हणून त्यांचा लौकिक आहे.

आपण व आपला परिवार देखील शहरामध्ये सामाजिक सलोखा जपण्याचे काम करीत आहाेत. जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे कुटुंब दहशतीखाली आहे. मानसिक स्थिती तणावाखाली असल्याने आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे सय्यद यांनी नमूद केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment