अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात झाली आहे. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी व नगर तालुक्यातील जखणगाव या दोन गावांतील 973 कर्जदार शेतकर्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून,
पहिल्या दिवशी 50 टक्के कर्जदार शेतकर्यांचे आधार प्रामाणिकरण करण्यात आले. येत्या दोन दिवसांत कर्जखात्यावर रक्कम जमा होणार असल्याने, या दोन्ही गावांत शेतकर्यांनी दिवाळी साजरी केली.
साहेब, मागच्या काळात कर्जमाफीसाठी लईवेळा हेलपाटे मारावे लागले. यावेळी फक्त थम्ब (अंगठा) दिला, अन काम झालं. अगदी सुटसुटीत आहे!,’ असे उद्गार आहेत राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावच्या पोपटराव भानुदास मोकाटे यांचे.
मोकाटे यांनी सोमवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांचे हे उद्गार म्हणजे सरकारसाठी आशीर्वादच आहेत. आनंदात राहा आणि हे आशीर्वाद कायम असू द्या, असे मोकाटे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात सोमवारी झाली. प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील नगर तालुक्यातील जखणगाव व राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी या दोन गावांतील याद्यांचे प्रसिद्धीकरण करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयातील इतर मंत्री तसेच अधिकारी यांनी त्यातील काही गावांतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
अहमदनगर जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) आणि जखणगाव (ता. नगर) येथील शेतकऱ्यांना या संवादाची संधी मिळाली. नाशिक विभाग महसूल आयुक्त राजाराम माने , जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com