अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मेव्हणीच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून तिची बदनामी करणा-या तरुणाला येथील सायबर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) अटक केली आहे.
रमेश अशोक कावरे (रा़ कुकाणा ता़ नेवासा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेश कावरे हा त्याच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलीला गेल्या काही महिन्यांपासून व्हिडिओ कॉल करून तसेच व्हिडिओ पाठवून त्रास देत होता.
एक दिवस रमेश याने सदर मुलीच्या घरी जाऊन तिला उचलून नेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सदर मुलीच्या नावे फेसबुकवर एक बनावट अकाउंट तयार करण्यात आले. या अकांउंटवरून सदर मुलीच्या नात्यातील एका व्यक्तीला मेसेज पाठविले.
याबाबत सदर मुलीने येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास केला. तेव्हा रमेश कावरे यानेच हे बनावट अकाउंट तयार केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्यावर गुन्ह दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com