आजपासून पाच दिवसांचा आठवडा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-शासकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण हलका करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची शनिवार २८ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी होणार आहे.

त्यामुळे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. दरम्यान, या निर्णयाचे सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वागत करून सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ शुक्रवारी राजपत्रित अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांनी घेतली.

पाच दिवसांचा आठवडा केल्याने अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी वाढली आहे. ती जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्याचे वचन या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले. जिल्हाधिकारी कार्यालय येथील प्रियदर्शिनी सभागृहात हा कार्यक्रम झाला.

राजपत्रित अधिकारी महासंघाचे नगर जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, राज्य कार्यकारिणीचे जनसंवाद संघटन सचिव, विठ्ठलराव गुंजाळ, कोषाध्यक्ष तथा कोषागार अधिकारी महेश घोडके,

महासंघाच्या दुर्गा मंचच्या जिल्हाध्यक्षा तथा तहसीलदार वैशाली आव्हाड, उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, तहसीलदार घोरपडे आदींसह अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment