अहमदनगर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरक महोत्सवानिमित्त राज्यभरात दोन महिने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नगर शहरात या नागरी स्वच्छता अभियानासह सिंगल युज प्लॅस्टिक मुक्त शहर अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि.1) महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला.
सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक परिसरातून या अभियानास सुरूवात करण्यात आली. यावेळी उपायुक्त सुनील पवार, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, शहर अभियंता सुरेश इथापे आदी उपस्थित होते. मनपा अधिकारी, कर्मचार्यांसह परिसरातील नागरिकांच्या सहभागातून रस्ते व मोकाळ्या जागांवरील प्लॅस्टीक गोळा करण्यात आले.
अभियानात प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, मुख्य स्वछता निरीक्षक राजकुमार सारसर, प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहेत्रे, उद्यान विभागचे शशिकांत नजान, उद्धव म्हसे, संत निरांकरी भवनाचे प्रमुख हरिष खूबचंदानी, स्वछता निरीक्षक परीक्षित बिडकर, तुकाराम भांगरे, बाळासाहेब विधाते, अविनाश हंस, सुरेश वाघ, राजेंद्र सामल आदी सहभागी झाले होते.
अहमदनगर -महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरक महोत्सवानिमित्त राज्यभरात दोन महिने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नगर शहरात या नागरी स्वच्छता अभियानासह सिंगल युज प्लॅस्टिक मुक्त शहर अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि.1) महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला.