अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उत्तर प्रदेशात स्वाइन फ्लूच्या संसर्गामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात या तापाने मरणाऱ्यांची संख्या नऊ झाली आहे.
एकट्या मेरठमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत १७ जवानांना या तापाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
मेरठचे मुख्य आराेग्य अधिकारी राज कुमार म्हणाले, ताप, सर्दी आणि अशा प्रकारच्या अन्य लक्षणांच्या तक्रारीसह दाखल झालेल्या सहाव्या बटालियनच्या २७ पीएसी जवानांपैकी १७ जणांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आली.
त्यामुळे बटालियनमधील ३७० जवानांना टॅमीफ्लूच्या गाेळ्या देण्यात आल्या आहेत. संक्रमण व प्रसार राेखण्यासाठी त्यांना छावणीतच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या आता ७१ झाली आहे. आणखी ४० खाटा लावण्यात आल्या असून एकूण संख्या ५६ झाली आहे.रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढवण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com