अहमदनगर लाईव्ह24 टीम :- रविवारी कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. शेतकरी सुखावले असतानाच दुसरीकडे अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने आनंदावर विरजण पडले. जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी व गारपिटीच्या पावसामुळे सुमारे १ हजार ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
नुकसानीचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने राज्य सरकारकडे सोमवारी सादर केला. अवकाळीचा सर्वाधिक फटका शेवगाव व पाथर्डी तालुक्याला बसला. जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी गारांसह जोरदार पाऊस झाला.
पावसामुळे पाथर्डी, नेवासे व शेवगाव तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाथर्डी तालुक्यातील १९ गावांना अवकाळी पावसाचा, तर १२ गावांना गारपिटीचा फटका बसला. गहू, मका, हरभरा, ज्वारी व बाजरीचे ४३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले.
गारपिटीमुळे १९२ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, त्यात गहू, मका, हरभरा व ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. शेवगाव तालुक्यातील सतरा गावांना अवकाळीचा फटका बसला.
एका गावाला गारपिटीचा तडाखा बसला. ६१५ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा, केळी व लिंबू ही पिके धोक्यात आली. या तालुक्यात टरबुजांचेदेखील मोठे नुकसान झाले. नेवासे तालुक्यातील एका गावाला गारपिटीचा फटका बसला. तेथील ९.५ हेक्टर क्षेत्रावरील गहू व कांद्याचे नुकसान झाले.
अवकाळी पावसामुळे पन्नास गावांमधील एक हजार क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. गारपिटीमुळे २०४ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. नुकसानीचा प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाने राज्य सरकारकडे सोमवारी सादर केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com