Panjabrao Dakh : पंजाबरावांचा अंदाज…! दसऱ्याच्या आदल्या दिवशी राज्यातील ‘या’ जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस

Published on -

Panjabrao Dakh : मित्रांनो भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार, राज्यात परतीच्या पावसाला (Rain) सुरुवात झाली असून परतीचा पाऊस राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार कोसळत आहे. आज देखील भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची (Monsoon) शक्यता असल्याचे वर्तवले आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मध्ये आज नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजी महाराज नगर, नासिक, ठाणे, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली, या जिल्ह्यात पावसाची (Monsoon News) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित असलेले व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.

पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, 4 ऑक्टोबर पर्यंत राज्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र या विभागात पाऊस कायम राहणार आहे. पंजाबराव त्यांच्या मते नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी अकोला वाशिम छत्रपती संभाजी महाराज नगर जालना लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली व अहमदनगर या जिल्ह्यात चार ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पंजाब रावांनी 28 ऑक्टोबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होणार असल्याचे वर्तवले आहे. निश्चितच मान्सून आता अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान परतीच्या पावसाने राज्यात काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची मोठी नासाडी केली आहे. मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सारखा पाऊस झाला होता.

त्यामुळे त्यावेळी खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला होता. दरम्यान आता परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना तसेच फळबागांना मोठा फटका बसला आहे. मात्र जाणकार लोकांच्या मते, परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात मोठा फायदा होणार आहे. रब्बी हंगामात पावसाची कमतरता भासणार नसल्याचे जाणकार नमूद करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe