IMD Rain Alert : मान्सूनचा (Monsoon) पाऊस आता परतीच्या दिशेने निघाला आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे (Kharip Season) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत परतीचा आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
राज्यात विजांच्या कडकडाटासह अनके भागांत पावसाची दमदार हजेरी चालू आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भ, मराठवाड्यात (Vidarbh and Marathwada) पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळणार आहे.
नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद आणि लातुरात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 28 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड आणि लातुरात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस कोसळणार (Heavy Rain) असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून फारसा पाऊस पडत नाही. तथापि, भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मुंबईत लवकरच पाऊस सुरू होईल. बुधवारीही मुंबई महानगरात हलका पाऊस झाला.
त्याचवेळी, आयएमडीने गुरुवारी म्हणजेच आजही शहरात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यासह, तुम्हाला सांगूया की भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, ऑक्टोबरमध्ये मुंबई शहरात मान्सूनचे पुनरागमन होईल आणि पुन्हा एकदा चांगला पाऊस होईल.
हवामान खात्यानुसार, आज तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पाऊस पडू शकतो. यासोबतच आजही उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, उत्तराखंड, मेघालय, अंदमान आणि निकोबारच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. तसेच कोस्टल आंध्र प्रदेश आणि यानाममध्ये 30 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.