Panjabrao Dakh : पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज…! ऑक्टोबर महिन्यात पडणार पाऊस, ‘या’ तारखेला पाऊस बंद होणार

Published on -

Panjabrao Dakh : राज्यात परतीच्या पावसाला (Rain) सुरुवात झाली असून अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) होत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने सुमारे तीन ते चार दिवस महत्त्वाचे राहणार असल्याचे नमूद केले आहे.

पुढील तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागात पावसाची (Monsoon News) शक्‍यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यात आगामी तीन ते चार दिवस पाऊस कोसळणार आहे.

राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, शिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) त्यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात 2 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे. 2 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजी महाराज नगर, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली व अहमदनगर या जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय ऑक्टोबर महिन्यात दोन मोठे पाऊस होणार असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे. ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या सुमारास पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव यांनी स्पष्ट केले आहे.

विदर्भात या कालावधीत पाऊस कोसळणार असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. तसेच 28 ऑक्टोबर पासून राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे. यामुळे निश्चितच आगामी काही दिवसात राज्यातून पाऊस जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe