दारुड्याने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पारनेर तालुक्यातील गुणोरे परिसरात गुरूवारी सकाळी दहाच्या सुमारास भांडणे करणाऱ्या मद्यपी तरूणांच्या टोळक्याने केलेल्या गोळीबारात वाटसरू तरूणाच्या हातास गोळी लागून तो जखमी झाला.

संजय पवार (राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर शिरूर (जि. पुणे) येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय सीमा सुरक्षा दलात आहे.

हातास गोळी चाटून गेली असून जखम फारशी गंभीर स्वरूपाची नाही, असे पोलिसांनी सांगितले. गोळीबारासाठी छऱ्याची बंदूक वापरण्यात आली असावी, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी रूग्णालयात जाऊन तरूणाचा जबाब नोंदवला.

उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, सहायक निरीक्षक राजेश गवळी, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनीही जखमीची भेट घेतली. पुणे जिल्ह्यातील टाकळीहाजी व कवठे येथील चौघे तरूण गुरूवारी सकाळी तालुक्यात आले होते.

मद्यपान केल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी निघाले. गुणोरे गाव ओलांडल्यावर त्यांच्यात वाद सुरू झाला. सीमा सुरक्षा दलातील जवान संजय पवार हा त्याचे मेहुणे दादाभाऊ चव्हाण हे सुटीवर आले असल्याने त्यांना भेटण्यासाठी दुचाकीवरून टाकळीहाजी येथे निघाला होता.

वाटेत भांडण सुरू असल्याचे पाहिल्यावर तो थांबला. भांडण सुरू असताना चौघांपैकी एकजण पळून जाऊ लागला. त्याला रोखण्यासाठी इतर तिघांपैकी एकाने पिस्तूल काढून गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

पिस्तुलातून निघालेली गोळी भांडणे पाहणाऱ्या संजयच्या हाताला लागून तो जखमी झाला. नंतर टोळक्यातील तरूण पसार झाले. संजयने मोबाइलवरून मामाशी संपर्क केल्यानंतर ते आले.

त्यांनी जखमी संजयला दुचाकीवरून शिरूर येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. सायंकाळी हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृतीस कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment