Panjabrao Dakh : राज्यात सध्या परतीचा पाऊस (Monsoon) सुरू आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील कोकणात तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाची (Monsoon News) शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाच्या मध्ये आज कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

या जिल्ह्यात सर्वदूर पाऊस (Rain) कोसळणार नसून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे. दरम्यान उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
यादरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज पासून राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. आज एक ऑक्टोबरपासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत राज्यात कडक ऊन पडणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत.
मात्र राज्यात 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याचे पंजाबराव डख यांनी नमूद केले आहे. तसेच राज्यात 28 ऑक्टोबर पासून थंडीला सुरुवात होणार आहे. निश्चितच ऑक्टोबर महिन्यात दोन-तीन मोठे पाऊस होणार आहेत. मित्रांनो पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा मोठा गाढा विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या मते पंजाबराव डख यांनी नमूद केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत असून याचा त्यांना फायदा होत आहे. मित्रांनो आता मान्सून माघारी जात आहे.
यावर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाला असून राज्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली आहेत. अशा परिस्थितीत येत्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची चणचण भासणार नसल्याचे जाणकार सांगत आहेत. या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते.
या परिस्थितीत शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात अधिक उत्पादनाची आशा आहे. सध्या परतीचा पाऊस कोसळत असल्याने या पावसाचा फायदा रब्बी हंगामात होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. निश्चितच खरीप हंगाम जरी शेतकऱ्यांच्या हातून गेला असला तरी देखील रब्बी हंगामात याची भरपाई निघणार आहे.