अहमदनगर लाईव्ह24 टीम :- औरंगाबाद हायवेवर असलेल्या नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील टोलनाका परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह आणून टाकला आहे.
आज सकाळी ही घटना स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरदायी तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या तरुणाची ओळख पटली नसून मारहाण करत खून करून मृतदेह बांधून टोलनाका परिसरात आणून टाकला आहे.
अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com