Maharashtra News:प्रसार माध्यमांना टाळण्यासाठी राजकीय नेते अनेकदा विविध क्लुप्त्या वारतात. बोलायचे नसेल आणि पत्रकारांनी गाठलेच तर नो कॉमेंटस म्हणत अगर गोल गोल उत्तरे देत पत्रकारांची बोळवण करतात.
पुण्यात मात्र पालकमंत्री आणि भाजचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाराला थेट हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. कॅमेरा घेऊन पुढे आलेल्या पत्रकाराला मंत्री पाटील म्हणाले,

‘घरी जा… बायको वाट बघतेय. हा क्षण पत्रकाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हायरल होत आहे. चंद्रकांत पाटलांनी पुणे जिल्हा परिषदेच्या आढावा बैठक घेतली. तेथून ता असताना त्या बैठकीत काय झाले,
याची माहिती घेण्यासाठी एका वृत्त वाहिनीचा पत्रकार मंत्री पाटील यांच्या वाहनाजवळ गेला. पाटील आपल्या गाडीत बसत होते. यावेळी पत्रकाराने बैठकीत काय चर्चा झाली? याबाबत विचारले.
त्यावर मंत्री पाटील म्हणाले, “काम नाही, धाम नाही, घरी जा… बायको वाट पाहतेय” असे पाटील म्हणाले. सर, बराचवेळ थांबलो आहे, प्लीज बोला, अशी विनवणी करतानाही पत्रकार त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.