Tractor News : भारतीय शेतीत (Farming) आता मोठा बदल झाला आहे. आता मनुष्यबळ कमी करण्यासाठी शेतकरी बांधव (Farmer) यंत्रांचा वापर करू लागले आहेत. मजूर टंचाई निर्माण झाली असल्याने आता शेतकरी बांधव शेतीतील जवळपास सर्वच कामे यंत्राच्या साह्याने करण्यास अधिक पसंती दर्शवीत आहेत. शेती यंत्रांमध्ये ट्रॅक्टरचा (Tractor) देखील समावेश आहे. शेतकरी बांधव ट्रॅक्टरच्या (Tractor Information) साह्याने पेरणीपूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंत सर्वच कामे करत आहेत.
आता शेतकरी बांधव फवारणी साठी देखील ट्रॅक्टरचा उपयोग करू लागले आहेत. शेतकरी बांधव आता छोट्या ट्रॅक्टरच्या साह्याने फळबागेत फवारणी करत आहेत. याशिवाय छोट्या ट्रॅक्टरचा (Mini Tractor) वापर कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना देखील फायद्याचा ठरत आहे. कमी जमीन असलेले शेतकरी बांधव ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपली शेतीची सर्व कामे करत आहेत. ट्रॅक्टरच्या साह्याने नागरणी पासून ते रोटावेटर चालवण्यापर्यंत सर्व कामे केली जातात.
अशा परिस्थितीत आता वैयक्तिक शेतीकामासाठी शेतकरी बांधव छोटा ट्रेक्टर मोठ्या प्रमाणात विकत घेत असल्याचे चित्र आहे. यामुळे आज आपण पाच लाखाहून कमी किमतीत भारतात उपलब्ध असलेल्या मिनी ट्रॅक्टर विषयी किंवा छोट्या ट्रॅक्टर विषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
Vst शक्ती MT 270 विराट :- हा छोटा ट्रॅक्टर 27 एचपी आणि 4 सिलिंडर इंजिनसह येतो. त्याची इंजिन पॉवर 1306 CC आहे. VST शक्ती MT 270 विराटचे इंजिन रेट केलेले RPM (RPM) 2800 आहे. हा ट्रॅक्टर ऑइल इमर्स्ड ब्रेक्स आणि कॉन्स्टंट मॅक्स गिअरबॉक्सने सुसज्ज आहे ज्यामध्ये 8 गीअर्स फॉरवर्डसाठी आणि 2 गिअर्स रिव्हर्स साठी दिले आहेत. या ट्रॅक्टरची उचलण्याची क्षमता 1000 किलो आणि डिझेल टाकी 18 लिटर आहे. Vst शक्ती MT 270 विराट ट्रॅक्टरची टर्निंग त्रिज्या 2100 MM आहे. Vst शक्ती mt 270 विराट ट्रॅक्टरची किंमत 4 लाख 45 हजार 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंत आहे.
कॅप्टन 200 DI :- कॅप्टन 200 DI ट्रॅक्टर 20 HP आणि 1 सिलेंडर मशीनसह उपलब्ध आहे. यात 895 सीसीचे इंजिन आहे. हा ट्रॅक्टर 8 फॉरवर्ड गीअर्स आणि 2 मागील गीअर बॉक्सने सुसज्ज आहे. त्याची टर्निंग त्रिज्या 2200 मिमी आहे. या ट्रॅक्टरमध्ये मल्टी स्पीड पीटीओ देण्यात आला आहे. या वैशिष्ट्यांमुळे कॅप्टन ट्रॅक्टर्सने शेतकऱ्यांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. हा ट्रॅक्टर परदेशातही निर्यात केला जातो. कॅप्टन 200 DI ट्रॅक्टर 2 व्हील ड्राइव्ह आणि 4 व्हील ड्राइव्ह या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या 2 व्हील ड्राईव्हची किंमत 2 लाख 70 हजार ते 3 लाख रुपयांपर्यंत आणि 4 व्हील ड्राइव्हची किंमत 3.20 लाख ते 3.60 लाख रुपयांपर्यंत आहे.
स्वराज 717 :- हा ट्रॅक्टर एक सिलेंडर आणि 15 एचपी मशीनने सुसज्ज आहे. स्वराज 717 ला स्लाइडिंग मेश गियर बॉक्स बसवले आहे. यात समोर 6 गीअर्स आणि मागील बाजूस 3 गीअर्स आहेत. यात ड्राय डिस्क ब्रेक आहेत. स्वराज 717 ट्रॅक्टरची 780 किलो पर्यंत उचलण्याची क्षमता आहे. या ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही कल्टीव्हेटर, रोटाव्हेटर तसेच ट्रॉली वापरू शकता. स्वराज 717 ट्रॅक्टर किमतीच्या दृष्टीने अत्यंत किफायतशीर आहे. स्वराज 717 ट्रॅक्टरची किंमत 2 लाख 70 ते 3 लाख रुपये आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की येथे दिलेली किंमत ही एक्स शोरूम किंमत आहे. त्यामुळे जेव्हा आपण शेतकरी बांधव ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यांना आरटीओ फीस आणि इतर कर अदा करावे लागणार आहेत. यामुळे या सर्व ट्रॅक्टरची किंमत वाढणार आहे. ही किंमत स्थानिक पातळीवर बदलत असते. मात्र एक्स शोरूम किंमत ही ठरलेली असते.