अहमदनगर :- भांडण झालेल्या तरुणास घरात लपवून ठेवल्याच्या संशयावरून पाच ते सहा जणांनी एका महिलेसह तिघांना तलवारीचा धाक दाखवत मारहाण केली.
केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सुप्रिया महेश गाडे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे.
फिर्यादीच्या घरासमोर मोठ्याने आरडाओरड सुरू होती. ते पाहण्यासाठी गाडे घराबाहेर आल्या. बाळू ऊर्फ प्रवीण मनोहर शिंदे हे योगेश आदिनाथ पालवे याच्या घरात तलवार घेऊन आले.
दीपक अर्जुन शेलार, सूरज लक्ष्मण गवळी, सुरेश सुभाष झरेकर, संजय तरटे (सर्व रा. केडगाव) व इतर तीन ते चार अनोळखी तरुण सूरज अर्जुन लहाने याला शोधत आले.
सूरज मिळून आला नाही म्हणून आरोपी गाडे यांच्या घरात घुसले. सूरजला तुम्ही लपवले असे म्हणत त्यांनी तलवारीचा धाक दाखवत फिर्यादीसह घरातील तिघांना मारहाण केली.
- जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा बदली करून घ्या ! जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा इशारा ; पारनेर येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक
- चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सचिव संजय जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार संपन्न
- सोयाबीनच्या आगमनाने सुर्यफुलाचे दर्शन दुर्मिळ
- बीड प्रकरणातील दोषींना थारा दिला जाणार नाही : अजित पवार
- भूकंपाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित करण्याची गरज : पंतप्रधान