Panjabrao Dakh : मित्रांनो राज्यात दोन दिवसांपासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यात परतीचा पाऊस सुरू असून काही ठिकाणी परतीचा पाऊस (Monsoon) जोरदार स्वरूपाचा कोसळत आहे. राज्यात मुंबई तसेच ठाणे सह परिसरात हलक्या स्वरूपाच्या पावसाची (Monsoon News) नोंद झाली आहे.
दरम्यान उर्वरित राज्यात पावसाची उघडीप पाहायला मिळाली. मात्र असे असले तरी आज पुन्हा एकदा परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते आज राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने या संबंधित विभागाला येलो अलर्ट देखील जारी केला आहे. आज विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात देखील आज पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे.
पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार सहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपल्या पिकांची काढणी करून घ्यावी असा सल्ला देखील पंजाबराव यांनी दिला आहे. सध्या सोयाबीन पिकाची काढणी प्रगतीपथावर असल्याने शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाची काढणी केल्यानंतर सोयाबीन सुरक्षित ठिकाणी ठेवावा. कारण की 6 तारखे नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस कोसळणार आहे.
सहा ते नऊ ऑक्टोबर राज्यातील नासिक विदर्भ या विभागात पावसाची शक्यता आहे. तसेच आठ ते नऊ या दोन दिवसात राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा सातारा सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय 9 ते 10 ऑक्टोबर राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा सातारा सांगली कोल्हापूर तसेच अहमदनगर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
याशिवाय 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील पूर्व विदर्भ मराठवाडा मुंबई उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यादरम्यान नाशिक जिल्ह्यात तसेच उत्तर महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे.