अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून राज्य सरकार, रूग्णालये, सामाजिक संस्था व संघटना या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहे. सध्या मोबाइलवर ऐकू येणारी करोना व्हायरसची माहिती देणारी कॉलरट्यूनमुळे ग्राहक वैतागले आहे.
करोनाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारकडून लावण्यात आलेल्या कॉलरट्यूनची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या ऑडिओच्या सुरुवातीलाच येणारा खोकल्याचा आवाज ऐकल्यावर चिडचिड होते, अशी प्रतिक्रियाही सर्वसामान्यांमध्ये उमटत आहे.
शिंक, खोकला यामुळे पसरणारे रोग हे खूप जास्त संसर्गजन्य असतात. त्यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेला उपक्रम स्त्युत्य आहे. मात्र, ही कॉलरट्यून काढून टाका, असाही सूर ऐकू येतो. तर भारतासारख्या देशामध्ये अशा आजारांबाबत या कॉलरट्यूनमुळे अधिक वेगाने जनजागृती होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
मोबाईल कंपन्या कॉलर ट्यून लावतात किंवा आपण सुद्धा कॉलर टोन सेट करू शकतो. पण सध्या प्रत्येकाच्या मोबाईलवरती कॉलर ट्यून सेट असल्याने आपल्याला बदलणाया वाव नाही.
त्यामुळे आपल्याला योग्य बटन जर आपण लागले आणि सुरक्षित राहून झटपट कामे करू शकतो. त्यासाठी कॉल लावल्यानंतर हॅश बटन प्रेस करावे. यानंतर लागलीच आपला कॉल कनेक्ट होईल.
गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या मोबाईलवर खोकल्याची कॉलर ट्यून ऐकायला मिळते आहे. यामुळे प्रत्येकजण वैतागला असेल पण काळजी करू नका, यावर उपाय सापडला असून कॉलर ट्यून वाजल्यास हॅश दाबून आपण कॉल उचलून न कोणत्याही अडथळ्याविना बोलू शकता.
दरम्यान ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती देणारी कॉलर ट्यूनच काही टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांच्या मोबाइलवर ऍक्टिव्ह केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com