अहमदनगर लाईव्ह24 टीम/ मुंबई : मध्यप्रदेशातलं काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार पडलं असून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 20 समर्थक आमदारांनी राजीनामे दिलेत तर 6 मंत्र्यांची मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हकालपट्टी केली आहे. पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
मध्यप्रदेशातल्या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रात जाणवणार का? काका जरा जपून…असं ट्वीट केलंय. त्यामुळे राज्यातल्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याचा राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली.
मध्यप्रदेशातील भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात जाणावतायत का??? काका जरा जपून…
— Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार) (@BhatkhalkarA) March 10, 2020
तर माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी हा पक्षाला मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा हा पक्षासाठी नि:संशय मोठा धक्का आहे. त्यामुळं पक्षाचं नुकसान होणार आहे. ते टाळता आलं असतं का मला माहीत नाही. महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत 80 तासांचं सरकार स्थापन केलं होतं.
त्यानंतर अजित पवारांचं बंड शरद पवारांच्या प्रयत्नांमुळे शांत झालं. शरद पवारांनीच अशक्य वाटणारं हे सरकार आणलं असं श्रेय दिलं गेलं. आता मध्यप्रदेशातल्या घटनेमुळे राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधले मतभेद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com