विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर कॉंग्रेस पक्षविरोधी नेते !

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते नाही, तर पक्षविरोधी नेते आहेत, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. 

ज्यांच्यावर पक्षाने जबाबदारी दिली, तेच चुकीचे वागत आहेत, असं म्हणत थोरातांनी विखेंना घरचा आहेर दिला. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघात थोरातांनी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वरमध्ये आयोजित विजय निर्धार सभेत ते बोलत होते. 

दरम्यान विधानसभेत भाषण झालं का विरोधी पक्ष नेते मुख्यमंत्र्यांच्या दालनात असायचे, असा गोप्यस्फोटही माजीमंत्री बाळासाहेब थोरातांनी यावेळी बोलताना केला.

शिर्डी विधानसभेतील जनताही काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील. विरोधी पक्षनेते आज या व्यासपीठावर असायला हवे होते. 

विखे पाटील परिवार काँग्रेसला ताकद देण्याऐवजी ताकद दाखवायचं आव्हान देत आहेत, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर घणाघाती टीका केली.


महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment