Panjabrao Dakh : पंजाब रावांचा सुधारित हवामान अंदाज आला रे…! ऑक्टोबर मध्ये कसा असेल पाऊस-पाणी? वाचा सविस्तर

Published on -

Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. राज्यात काल नाशिक जिल्ह्यातील काही भागात पावसाची (Monsoon) हजेरी बघायला मिळाली होती.

मात्र भारतीय हवामान विभागाने नमूद केलेल्या मराठवाडा आणि विदर्भ विभागात काल पावसाची (Monsoon News) उघडीप पाहायला मिळाली. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की काल भारतीय हवामान विभागाने (IMD) मराठवाडा आणि विदर्भात साठी येलो अलर्ट जारी केला होता.

मात्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची उघडीप पाहायला मिळाली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पासून मान्सून महाराष्ट्रातून माघारी फिरणार आहे. मात्र आज राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून पावसाची शक्यता आहे.

आज विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, आमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यातही आज पावसाची शक्‍यता आहे यामुळे या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात चिरपरिचित व्यक्तिमत्व अर्थातच पंजाबराव डख यांचादेखील हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) समोर आला आहे. पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवलेल्या आपला सुधारित हवामान अंदाजानुसार, उद्यापर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार असून कडक ऊन पडणार आहे. यामुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकांची काढणी बाकी असेल त्यांनी काढणी करून घ्यावी आणि काढणी केलेल्या शेतमालक सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ठेवावां.

कारण की सहा तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात. राज्यात सहा ते नऊ ऑक्टोबर दरम्यान मुंबई-नाशिक आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. आठ आणि नऊ ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता आहे.

तसेच 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी राज्यातील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ सांगली सातारा कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त राज्यात 10 ते 13 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा मुंबई दक्षिण महाराष्ट्र या विभागात पावसाची शक्यता आहे. या कालावधीत नासिकसमवेत उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News