लोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा – डॉ. सुजय विखे

Ahmednagarlive24
Published:

जामखेड :- निवडणूक विचाराची आहे. मतदान करताना विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करा. दोन्ही उमेदवारांची कौटुंबिक पाश्र्वभूमी तपासा, समोरच्या उमेदवाराची सखोल माहिती घेऊनच मतदान करा.

कुणाची दहशत आणि गुंडगिरी आहे हे पहा आणि लोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा, असे आवाहन भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केले. जामखेडमधील प्रचारसभांमध्ये ते बोलत होते.

पालकमंत्री राम शिंदे म्हणाले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची हिंमत पंतप्रधान मोदी यांनी दाखवली त्यामुळे प्रत्येक भारतीयांचा मान, अभिमान व स्वाभिमान उंचवला आहे.

वेगवेगळ्या योजनेतील भ्रष्टाचार कमी करून अनुदान थेट लाभधारकाच्या खात्यात जमा होत आहे. जामखेड विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला.

त्यातून अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लागले. मतदारसंघातील एकही गाव पक्क्या रस्त्यापासून वंचित राहिले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment