ज्योतिरादित्यांच्या कारवर दगडफेक करत जीवघेणा हल्ला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम / वृत्तसंस्था :- ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ताफ्यावर शुक्रवारी सायंकाळी येथील काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या प्रकरणी अज्ञात ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजप कार्यकर्त्यांन शिंदेंवर प्राणघातक हल्ला झाल्याचा दावा केला आहे.

‘ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कारचा ताफा शुक्रवारी सायंकाळी येथील कमला पार्क भागातून जात होता. त्यावेळी काही अज्ञात कार्यकर्त्यांनी त्यांचा मार्ग रोखण्याचा व त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी काहींनी त्यांच्या कारवर दगडफेकही केली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी ३० ते ३५ अज्ञात लोकांवर भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे,’ अशी माहिती श्यामला हिल्स पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिली.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही घटना धक्कादायक असल्याचा दावा करत यात सहभागी असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment