Tomato Farming : नोकरीला पण लाजवेल आपली शेती..! टोमॅटोच्या ‘या’ जातीची लागवड केल्यास लाखोंची कमाई होणार, डिटेल्स वाचा

Ajay Patil
Published:
tomato farming

Tomato Farming : भारतात भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. टोमॅटो हे देखील एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेती (Vegetable Farming) केली जाते.

खरं पाहता आता टोमॅटो लागवड (Tomato Cultivation) बारामाही शक्य झाली आहे. शेतकरी बांधव आता पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा (Polyhouse Technology) वापर करत टोमॅटोची बारा महिने लागवड करत आहेत. विशेष म्हणजे टोमॅटो (Tomato Crop) शेतीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे.

मात्र असे असले तरी जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना टोमॅटोच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी टोमॅटोच्या सुधारित जातींची लागवड केल्यास उत्पादन खर्चात बचत होते आणि उत्पादनात वाढ होते परिणामी उत्पन्नात शेतकऱ्यांना फायदा मिळतो.

अशा परिस्थितीत आज आपण टोमॅटोच्या काही सुधारित जाती (Tomato Variety) जाणून घेणार आहोत ज्या की महाराष्ट्रात लागवड केल्या जाऊ शकतील. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रात उत्पादित केल्या जाणार्‍या काही टोमॅटोच्या सुधारित जाती.

टोमॅटोची संकरित जात काशी आदर्श (VRT-1201) :- ही जात ICAR-IIVR, वाराणसी येथे 2016 मध्ये विकसित झाली आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीचे टोमॅटो पीक विषाणूजन्य रोगास प्रतिरोधक असते. या जातीपासून 600 क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळवल जाऊ शकते.

या जातीच्या पेरणीसाठी हेक्‍टरी 400 ग्रॅम बियाणे आवश्यक असते. या जातीची देखील रब्बी आणि खरीप हंगामात पेरणी केली जाऊ शकते. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात या जातीच्या टोमॅटो पिकाची लागवड करता येणे शक्य होणार आहे.

काशी सिलेक्शन किंवा काशी निवड :– ही एक टोमॅटोची सुधारित जात आहे. IIVR, वाराणसी येथे 2019 मध्ये ही जात विकसित करण्यात आली आहे. अनिश्चित  Ty3 जनुक वाहून नेणाऱ्या ToYLCVD ला प्रतिरोधक आणि लवकर येणार्‍या ब्लाइटला सहनशील आहे. 140 दिवसांच्या पीक कालावधीत उत्पादन क्षमता 600-700 क्विंटल प्रति हेक्टर आहे.

या जातीच्या पेरणीसाठी हेक्‍टरी 400 ग्रॅम बियाणे पुरेसे होते. खरीप आणि रब्‍बी हंगामात या जातीच्या टोमॅटोची लागवड करता येणे शक्य आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात या जातीच्या टोमॅटो पिकाची लागवड करता येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe