धक्कादायक : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय…  

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम / मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, ती २६ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली. 

कोरोनाच्या वाढत्या संकटाला रोखण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत म्हणजेच शहरी क्षेत्रातील सर्व सरकारी तसेच खासगी शाळा-कॉलेजेसना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या शिवाय मॉल्सदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, यामध्ये मॉल्समधील जीवनावश्यक वस्तूंचा विभाग मात्र सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दहावी-बारावी तसेच महाविद्यालयीन परीक्षा मात्र विहित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६ वर गेल्याचे सांगून राजेश टोपे म्हणाले, यात पुण्यातील १०, मुंबई ५, पनवेल कामोठे १, नवी मुंबई १, कल्याण १, नागपूर ४, अहमदनगर १, ठाणे १ आणि यवतमाळ २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment