अहमदनगर ब्रेकिंग : कौन बनेगा करोडपतीच्या नावाखाली ४२ लाखांची फसवणूक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अहमदनगर : ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला ६ करोडची लॉटरी लागल्याच्या नावाखाली एकाची ४२ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना कर्जतमध्ये घडली.

या प्रकरणी सुरेश माधवराव शेजवह (वय ६८, रा.थिटेवाडी, ता.कर्जत) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार राणाप्रताप सिंग (रा.कोलकाता) व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत फिर्यादीनुसार कर्जत पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी राणाप्रताप सिंग याने फिर्यादी सुरेश शेजवह यांना तुम्हाला कौन बनेगा करोडपतीच्या कार्यक्रमांतर्गत ६ कोटीची लॉटरी लागली आहे, असे सांगितले. ही रक्कम मिळविण्यासाठी तुम्हाला रिचार्ज भरावा लागेल, असे आमिष दाखविण्यात आले.

फिर्यादीने आरोपीच्या सांगण्यानुसार वेळोवेळी ४२ लाख २२ हजार रुपये स्टेट बॅंक ऑफ इंडिया (कर्जत), युनियन बॅंक (अहमदनगर) व आयडीबीआय बॅंक (नगर) या खात्यांद्वारे भरले. २१ फेब्रुवारी २०१५ ते २४ नोव्हेंबर २०१७ या दरम्यान ही घटना घडली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment