Agriculture News : भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशातील बहुतांशी जनसंख्या ही शेतीवर (Agriculture) आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर वेगवेगळ्या कल्याणकारी शेतकरी हिताच्या योजना (Yojana) सुरू करत असतात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारकडून केली जाते.
आपल्या राज्यात देखील राज्य सरकारने वेगवेगळ्या योजना (Farmer Scheme) सुरू केल्या आहेत. मित्रांनो आता राज्यातील शेतकरी बांधवांना अनुदानावर (Subsidy) सोयाबीन टोकन यंत्र उपलब्ध होणार आहे.
सोयाबीन टोकण यंत्रासाठी शेतकऱ्यांना तब्बल 50 टक्के अनुदान मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या शेतकऱ्यांना सोयाबीन टोकण यंत्रासाठी अनुदान मिळणार आहे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
50 टक्के अनुदानावर मिळणार सोयाबीन टोकण यंत्र
मित्रांनो त्यासाठी आपणास ठाऊकच आहे आपल्या राज्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विशेषता मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
अशा परिस्थितीत मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील (latur) शेतकऱ्यांना जिल्हा परिषद लातूर सेस फ़ंडअंतर्गत सोयाबीन टोकण यंत्रासाठी अनुदान दिले जाणार आहे. हे सदर अनुदान डीबीटी तत्त्वावर लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांना मिळणार आहे. सोयाबीन टोकन यंत्रासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
सोयाबीन टोकण यंत्रासाठी अनुदान मिळवणे हेतू आवश्यक कागदपत्रे
अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचा 7 /12, 8-अ उतारा असणे आवश्यक आहे. याशिवाय अर्जदार शेतकऱ्याला आधार कार्ड, बँक पासबुकाच्या झेरॉक्स, अनु. जाती, अनु. जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र, अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स लागणार आहेत. याशिवाय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावा लागणार आहे.
20 ऑक्टोबर पर्यंत करा अर्ज
अनुदानासाठी निवड झालेल्या शेतकरी बांधवांना एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून सोयाबीन टोकण यंत्र खरेदी करावी लागणार आहे. मित्रांनो या योजनेसाठी 20 ऑक्टोबर 2022 ही अंतिम तारीख ठरविण्यात आली आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पंचायत समिती कार्यालयात वर नमूद केलेल्या कागदपत्रासह या योजनेसाठी लवकरच अर्ज करावा लागणार आहे. यासाठी महाडीबीटी फार्मर पोर्टल या वेबसाइटवरून देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो.