खासदार सुजय विखेंनी महामार्गाच्या कामाचा ठेकेदार बदलला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम / करंजी :- दीडशेहून अधिक प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कल्याण-विशाखापट्टणम्, राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विशेष प्रयत्नांतून मुहूर्त मिळाला असून, लवकरच या कामाला प्रारंभ होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने नगर- पाथर्डी प्रवास करणाऱ्यांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अर्धवट कामामुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत, त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत खा. विखे व आ. राजळे यांनी विधानभवनात प्रश्नोत्राच्या तासात हा विषय मांडला होता.

खा. विखे यांनी पाथर्डी येथे रस्त्याच्या कामासंदर्भात बैठक घेतली. या वेळी माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, सोलापूरच्या इंगवले पाटील कंट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी राजेंद्र बांदलकर ,राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता सी.आर.सोनवणे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण उपस्थित होते.

ठेकेदाराच्या गोंधळामुळे दोन वर्षांपासून महामार्गाचे काम रखडल्याने विविध अपघातात दीडशेहून अधिक जणांना आतापर्यंत प्राण गमवावे लागले. पूर्वीच्या ठेकेदाराचे काम स्थगित करून नव्याने सर्व प्रक्रिया राबविण्यात आली असून, सोलापूरच्या कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे.

कोणत्याही परिस्थितीत हे काम उपठेकेदाराकडे काम देऊ नये, कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड मान्य करणार नाही, काम सुरू झाल्यानंतर तांत्रिक अडचणी सांगू नका, शक्य झाल्यास दोन्ही बाजूंनी काम सुरू करून लवकरात लवकर काम पूर्ण करा, अशा सूचना खा. विखे यांनी ठेकेदाराला दिल्या आहेत.

दरम्यान, नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी खा. विखे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचेही या कामाकडे लक्ष वेधले होते. दोन वर्षांपासून रखडलेले काम पुन्हा सुरू होणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment