पाण्याच्या टाकीवर जोडप्याचे ‘गैरकृत्य’ अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावामध्ये संतापाचे वातावरण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहुरी :- पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बारागाव नांदूर येथील सार्वजनिक पाणीपुरवठा टाकीवर गैरकृत्य करणार्‍या जोडप्यांना प्रतिबंध करणार्‍या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचार्‍याला मारहाण झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अखेरीस ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याच्या टाकीला गेटची व्यवस्था केली. बारागाव नांदूर येथे 14 गावे व बारागाव नांदूर पाणी योजनेकडून पाणी वाटप केले जाते. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी 4 लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात आली आहे.

टाकीमध्ये पाणी जमा झाल्यानंतर गावाला पाणीपुरवठा केला जातो. गावातील डोंगराच्या कडेला उभारलेल्या टाकी जवळ सहसा कोणी जात नाही. परिणामी त्याचा लाभ काही टवाळखोरांनी घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

काही जणांनी जोडपे आणून पाण्याच्या टाकीवर नको ते कृत्य सुरू केल्याचे काही दिवसांपूर्वी एका कर्मचार्‍याच्या निदर्शनास आले. कर्मचार्‍याने संबंधितांस हटकले असता, त्याला मारहाण करीत दमदाटी करण्यात आली. घाबरलेल्या तरुणाने ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली.

त्यानंतर काही ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन पाहणी केली असता टाकीवरील झाकण बाजूला सरकवल्याचे निदर्शनास आले. टाकीवर नको त्या वस्तू आढळून आल्या. बारागाव नांदूरच्या पाण्याच्या टाकीवर काही जोडपी नको ते कृत्य करीत असल्याची चर्चा गावात पसरली.

त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविकास अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. अखेरीस ग्रामस्थांचा संताप पाहून सरपंच सुरेखा देशमुख, उपसरपंच युवराज गाडे, ग्रामविकास अधिकारी किसन भिंगारदे यांनी तातडीने पाण्याच्या टाकीकडे कोणीही जाऊ नये, म्हणून उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतल.

टाकीवरील झाकण पक्के केल्यानंतर टाकीला गेट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पाण्याच्या टाकीजवळ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नको ते कृत्य करणार्‍यांवर कारवाईसाठी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची सूचना तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराजे पवार यांनी दिली होती.

याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार राहुरी पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीची उंची सुमारे 100 ते 150 फूट उंच आहे. तसेच टाकीवर चढण्यासाठी जोखीम पत्कारावी लागते.

परंतु संबंधितांकडून अवैध कृत्यांसाठी जीवाची बाजी लावली जात होती. विरोध करणार्‍यांना मारहाणही केली जात होती. त्यामुळे गैरकृत्य करणार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे बाळासाहेब गाडे यांनी केली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाकडून प्रभाकर गाडे, निवृत्ती देशमुख, ग्रामस्थ अमजद पिरजादे, नबाब पटेल यांच्या उपस्थितीत पाण्याच्या टाकीला गेट बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment