Maharashtra News:केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्याच चिन्हावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही दावा केला आहे.
शिंदे गटाच्या तीन पर्यायांमध्ये त्रिशूळ आणि उगवता सूर्य यांचा समावेश आहे. दोघांचाही दावा झाल्यास ते चिन्ह कुणालाच मिळत नाही.

आता ठाकरे यांच्याकडे मशाल आणि शिंदे यांच्याकडे गदा ही वेगळी चिन्हे असल्याने तीच दिली जाण्याची शक्यता. ठाकरे यांना त्रिशूल आणि उगवता सूर्य ही धार्मिक चिन्हे मिळू नयेत यासाठी शिंदे गटाने ही खेळी केल्याचे मानले जाते.