Ahmednagar News :- अहमदनगर- मनमाड या महामार्गांचे दुरुस्तीच्या कामामुळे १५ ऑक्टोबर पासून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाबाबत नागरिकांच्या हरकती असतील तर त्या १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
हे पण वाचा : सोने खरेदीची हीच ती संधी ! दरात 3 महिन्यांतील सर्वात मोठी घसरण ; जाणून घ्या नवीन दर
अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूकीस विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन आहे.
अहमदनगर/पुणे-सोलापूरकडून मनमाड कडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळद घाट – दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर -औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापूर- वैजापूर- येवला मार्ग वळविण्यात येणार आहे. शनि शिंगणापुर /सोनई रोडवरुन वरुन मनमाड (राहुरीकडे) कडे येणाऱ्या अवजड वाहतूकदारांनी राहुरीकडे न येता अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावरुन इच्छित स्थळी जावे.
हे पण वाचा : अहमदनगर ब्रेकिंग : पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
मनमाड – येवला – शिर्डी कडून अहमदनगर मार्गे पुणे / मुंबई कल्याण कडे जाणारी अवजड वाहतूक पुणतांबा फाटा येथून चंदे कासार – संगमनेर आळेफाटा मार्ग वळविण्यात येणार आहे. मनमाड- येवला कडून अहमदनगर / सोलापूर / बीड कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुक पुणतांबा फाटा येथून वैजापूर- गंगापुर मार्ग कायगाव- प्रवरासंगम -शेंडी बायपास -विळद घाट – केडगाव बायपास मार्ग वळविण्यात येणार आहे. तसेच लोणी / बाभळेश्वर / श्रीरामपूर कडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाभळेश्वर- -श्रीरामपूर -टाकळीमान नेवासा मार्गे अहमदनगरकडे वळविण्यात येणार आहे.
हे पण वाचा : सोयाबीन बाजारभावात मोठी पडझड! आज ‘या’ बाजारात मिळाला 3 हजाराचा भाव, वाचा आजचे बाजारभाव
अत्यावश्यक मालाची वाहतूक करणारी वाहने, रस्ता दुरुस्तीकरीता आवश्यक वाहने व स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना या वाहतूक मार्गाच्या वापरापासून सूट देण्यात आली आहे. या पर्यायी वाहतूक मार्गासाठी नागरिकांच्या काही हरकती असल्यास शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अहमदनगर येथे समक्ष येवून किंवा [email protected] ई-मेलवर १४ ऑक्टोबर २०२२ पूर्वी नोंदवाव्यात. असे आवाहनही श्री.मनोज पाटील यांनी केले आहे.
हे पण वाचा : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV मिळवा फक्त 21000 रुपयांमध्ये; देते 315KM मायलेज