कोपरगाव :- देशाचा पंतप्रधान हा निधड्या छातीचा हवा. देशाचे संरक्षण करण्यासाठी सक्षम निर्णय घेणारा हवा. त्यासाठी नरेंद्र मोदी हेच योग्य आहेत.
कारण ते कणखर नेतृत्व आहे. पंतप्रधान मोदी व राहुल गांधींची तुलना होऊच शकत नाही. काँग्रेस आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही.

ही निवडणूक गल्लीची नसून दिल्लीची आहे, हे लक्षात ठेवा, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
शिर्डी मतदारसंघातील सेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी आंबेडकर मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते.
या वेळी आमदार स्नेहलता कोल्हे, नरेंद्र दराडे, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, रावसाहेब खेवरे,
राजेंद्र झावरे, प्रमोद लबडे, कैलास जाधव, विवेक कोल्हे, सुहास वहाडणे, सचिन तांबे, शरद थोरात, सुनील तिवारी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
- महाराष्ट्रातील 1ली ते 10वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या राहणार
- पंतप्रधान मोदीनी मन की बात मधून ऐतिहसिक घटनेचा आनंद द्विगुणीत केला-ना.विखे पाटील
- दिवाळीच्या आधीच महाराष्ट्राला मिळणार नवा Railway मार्ग ! ‘या’ जिल्ह्यांना मिळणार नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, कसा असणार रूट?
- लाडक्या बहिणींसाठी ऑगस्टचा महिना ठरणार खास ! 12 महिन्यांपूर्वीचा निर्णय रिपीट होणार, खात्यात जमा होणार इतके पैसे
- Post Office च्या ‘या’ बचत योजनेत गुंतवणूक सुरु करा, 60 महिन्यांनी होणार 7,00,000 रुपयांची कमाई !